Posts

Showing posts from March, 2021

मन मोकळं करत जा

Image
 मन! काय आहे मन?            मन एक असंख्य विचारांचा अनमोल ठेवा आहे. ज्यात अनेक नवे जुने विचार आणि अनके सुख दुःख लपून बसले आहे,आपले मन हे बावरे आहे ते क्षणात इथे तर  क्षणात कुठेहि असू शकते, त्याला कोणीहि बांधून ठेऊ शकत नाही किंवा कोणी अडवू हि शकत नाही. या मनात अनेक नाते, असंख्य प्रश्न असतात पण आपण कधी ते कोणा पुढे व्यक्त करत नाहीत. फक्त आपल्या मना जवळच्या व्यक्तींजवळच आपले मन मोकळे करतो कारण तसे केल्याने जरा मन मोकळे होते आणि आपल्याला बरे वाटते.           पण मला असेही वाटते की आपण आपले मन मोकळे करतो, आपले दुःख आपल्या जवळच्या माणसाला सांगतो पण आपले हे दुःख त्याला सांगून त्याला तर आपण दुःखी किंवा त्याला आपण वेगळा विचार करायला तर लावत नाहीत ना, कारण मन मोकळे करून आपल्याला चांगले वाटेल हो पण त्याच्या मनात विचारचक्र सुरु होईल त्याचे काय? त्यासाठी माझ्या सारखी माणसे कधी कधी आपले मन कोणा जवळीहि मोकळे करत नाहीत, फार क्वचित वेळप्रसंगी ते व्यक्त करतो. त्याला आपण माझा स्वार्थी स्वभाव म्हटले तरी चालेल, पण मी माझ्या मनापेक्षा इतरांच्या म...